विधानसभेत 19 आमदारांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अमर काळे, भास्कर जाधव, विजय वडेट्टिवार, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, अब्दुल सत्तार, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, डि. पी. सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक, कुणाल पाटील, दीपक चव्हाण, राहुल बोंद्रे, दत्ता भरणे, नरहरी जिरवाळ, वैभव पिचड, जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.

मुंबई - अर्थसंकल्पीय भाषण सुरु असताना गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे आज (बुधवार) डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॅनर फडकवाणे, टाळ वाजवणे, घोषणाबाजी करणे, अध्यक्षांच्या सूचनांचे पालन न करणे, सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे या प्रकरणी 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय भाषण सुरु असताना जे आमदार असभ्य, घटनेविरुद्ध वागले ते खूप वाईट आहे. मत मांडायचा अधिकार आहे. मात्र तरी आतापर्यंत कधीही जे झाले नाही, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाले. 19 आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित केले जात आहे, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अमर काळे, भास्कर जाधव, विजय वडेट्टिवार, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, अब्दुल सत्तार, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, डि. पी. सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक, कुणाल पाटील, दीपक चव्हाण, राहुल बोंद्रे, दत्ता भरणे, नरहरी जिरवाळ, वैभव पिचड, जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.

आमदारांच्या निलबंनानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका करत सगळ्या आमदारांना निलंबित करा, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहू असे म्हटले आहे.

Web Title: 19 MLAs in the assembly suspension