जनतेने शिकवला धडा; 'या' 19 आयारामांना दाखवले अस्मान | Election Results

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

विधानसभा निवडणुक निकाल लागल्यानंतर दलबदलू नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेने अस्मान दाखवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुक निकाल लागल्यानंतर दलबदलू नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेने अस्मान दाखवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.

राज्यभरात युतीच्या बाजूने लाट होती. या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या 35 नेत्यांना दोन्ही पक्षांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या 35 नेत्यांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे. 

शिवसनेतील पराभूत आयाराम
1)जयदत्त क्षीरसागर 
2)दिलीप सोपल 
3)नागनाथ क्षीरसागर
4)निर्मला गावित 
5)प्रदीप शर्मा
6)भाऊसाहेब कांबळे  
7)विजय पाटील
8)संजय कोकाटे
9)दिलीप माने  
10)शेखर गोरे 
11)रश्मी बागल  

भाजपमधील पराभूत आयाराम
1)धैर्यशील कदम
2)गोपिचंद पडळकर
3)रमेश आडसकर
4)भरत गावित
5)वैभव पिचड 
6)हर्षवर्धन पाटील
7)गोपालदास अग्रवाल
8)उदयनराजे भोसले (लोकसभा पोटनिवडणूक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 shivsena bjp candidates loosed Vidhansabha election 2019