1967 Koyna Earthquakes : कोयना धरणाने आजवर सोसलेत एक लाख 21 हजार भूकंपाचे धक्के!

अनेक गावांना पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला
Koyna Dam
Koyna DamEsakal

कोयना धरणाच्या परिसरामध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सुमारे पाचशे गावे व छोटी शहरे उद‍्ध्वस्त झाली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपैकी ही एक मोठी आपत्ती म्हणावी लागेल. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलयकारी भूकंपास आज ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

११ डिसेंबर १९६७ च्या त्या घटनेच्या कटू आठवणी लोकांच्या मनात आहेत. त्या रात्री झालेला भुकंप इतका भयावह होता की त्याने  १८० बळी घेतले. कारण या भूकंपाच्या धक्क्याने १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला. कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. ६.५ ते ७ रिश्टर स्केल तीव्रता असलेल्या त्या भूकंपाने जमीन हादरली. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. सुमारे ४० हजारांवर घरे भूकंपात बाधित झाली. आणि ९३६ जनावरे मृत झाली. अनेक ठिकाणी जमिनींना मोठ्या भेगा पडल्या होत्या. 

Koyna Dam
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : 11 पोलिस कर्मचारी निलंबित, प्रशासनाची मोठी कारवाई

१९६३ सालापासूनच कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत १ लाख २१ हजार २५७ धक्के या भागाने सोसले आहेत. १९६७ सालच्या त्या विनाशकारी भूकंपाच्या भेगा कालांतराने बुजल्या, मात्र भूकंपग्रस्तांच्या जखमा आजही ताज्या व भळभळणाऱ्या आहेत.

भूकंप कसा होतो?

पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने वेग उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसतो. त्या धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होतात. ती सभोवार पसरतात आणि त्याने सर्वकाही उद्धस्त होते.

Koyna Dam
Health Care: केळी आणि दूध एकत्र घ्यायची सवय आहे? होतील गंभीर परिणाम

1967 च्या भूकंपानंतर कोयना धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी सूक्ष्म तडे गेले होते. तातडीचे उपाय म्हणून 1969 पर्यंत हे तडे इपॉक्‍सी रेझिनने भरून काढण्यात आले आणि धरणाचा सांडव्याजवळच्या उंच भागात पोलादाच्या तारा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत ओवून त्यांना ताण देण्यात आला. या तारा प्रतिबलित करून धरणाचा हा भाग शिवल्यासारखा एकसंध करण्यात आला. यास प्राथमिक स्थिरीकरण’ असे म्हणतात.

Koyna Dam
Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

आजवरचे भूकंप

कोयना धरण झाल्यापासून कोयनेत भूकंप संशोधन व मापक केंद्र झाले. त्यामुळे ५७ वर्षांतील भूकंपाच्या नोंदी येथे आहेत. ५७ वर्षांत तब्बल एक लाख २१ हजार १३७ भूकंपांची नोंद आहे. तीन रिश्टर स्केलच्या आतील एक लाख १९ हजार ३७३, सौम्य धक्के म्हणजेच चार रिश्टर स्केलच्या आतील एक हजार ६५९ भूकपांचे धक्के बसले आहेत.

Koyna Dam
Himachal : प्रतिभा सिंहांना मागं टाकत CM पदाच्या शर्यतीत सुखविंदर यांनी मारली बाजी; जाणून घ्या 7 मुख्य कारणं

पाच रिश्टर स्केलपर्यंतच्या ९६ तर त्याहीपेक्षा जास्त नऊ भूकंपांची नोंदही आहे. दहा वर्षांत झालेल्या भूकंपांच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू कोयनाऐवजी वारणा खोऱ्याकडे सरकला आहे. दहा वर्षांत तब्बल तीन हजार ११० भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात २०१२ मध्ये सर्वाधिक एक हजार १४० तर २०१६ मध्ये सर्वांत कमी अवघे २७ भूकंपांचे धक्के आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com