lockdown
lockdown

तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना 'मॉलबंदी'चा फटका- व्यापारी संघटना

तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना 'मॉलबंदी'चा फटका- व्यापारी संघटना अनेक राज्यांमध्ये मॉल्स, शॉपिंग सेंटर्स सरू करण्यात आली आहेत 2 Lakh Employees affected due to Maharashtra Lockdown Extension Mall Shopping Centers closed

अनेक राज्यांमध्ये मॉल्स, शॉपिंग सेंटर्स सरू करण्यात आली आहेत

मुंबई: महाराष्ट्रातील मॉल अद्यापही बंद असल्याने सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे योग्य निर्बंधांसह मॉल व शॉपिंग सेंटर खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. साधारण गेले दीड वर्ष मॉल बंद राहिल्याने त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. मॉलचे दोन लाख थेट कर्मचारी तसेच मॉलमुळे ज्यांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो अशा किरकोळ व्यापाऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. या सर्वांची रोजीरोटी वाचविण्यासाठी मॉल व शॉपिंग सेंटर खुले करावेत, अशी मागणी असोसिएशनचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी केली आहे.

lockdown
शाब्बास मुंबईकरांनो! रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार

मॉल आणि शॉपिंगसेंटर मधून मोठी आर्थिक उलाढाल होत असून त्यामुळे राज्याला मोठा कर महसूलही मिळतो. दिल्ली आणि हरयाणा सरकारने अन्य बाजार तसेच मॉल पुन्हा सुरू केले असल्याने त्याचेच अनुकरण महाराष्ट्राने करावे, अशी विनंती व्यापा्री संघटना करत आहेत. मॉल खुले झाले तर रस्त्यावरील गर्दीतील धोकादायक वातावरणात खरेदी करण्यापासून ग्राहकांची सुटका होईल. मॉलमधील कर्मचाऱ्यांना गर्दी हाताळण्याचा अनुभव असल्याने नागरिकांना सुरक्षित वातावरणात खरेदी करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

lockdown
भाजपा पूरग्रस्तांसाठी देणार आमदारांचा एक महिन्याचा पगार!

राज्यातील 50 मोठे मॉल दीर्घकाळ बंद असून त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. तसेच सरकारचा दरमहा चार हजार कोटी रुपयांचा जीएसटी बुडाला आहे. एका मॉलमध्ये सरासरी दोनशे किरकोळ दुकाने असून पाच हजार लोक त्यांच्याशी संबंधित व्यवसाय करतात. या सर्वांनाच या निर्बंधांचा फटका बसला आहे. मॉल खुले केल्यास सरकारचे सर्व आरोग्यविषयक निर्बंध पाळले जातील, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com