loksabha election 2024
loksabha election 2024solapur

2 दिग्गज नेते उद्या सोलापुरात! प्रणिती शिंदेंच्या प्रचारानिमित्त राहुल गांधींची 4 वाजता सभा; पोलिस बंदोबस्त अन्‌ कसा असणार दौरा; शरद पवारही सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त उद्या बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापूर शहरातील मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राउंडवर सभा होणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून राहुल गांधी सभेच्या ठिकाणी येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांची सभा सुरू होणार आहे.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त उद्या (बुधवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापूर शहरातील मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राउंडवर सभा होणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून राहुल गांधी सभेच्या ठिकाणी येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांची सभा सुरू होणार आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच राहुल गांधी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. सोलापूरची विमानसेवा बंद असल्याने ते सिंहगड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापूर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात येणार आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय ते सभेचे ठिकाणी या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त असणार आहे.

राहुल गांधी सोलापूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट व १८ अधिकारी सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी देखील हेलिपॅडसह सभेच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील साडेबाराशे पोलिस अंमलदार, पाचशे होमगार्ड, तीन पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस उपायुक्त, जवळपास १०० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असा पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय नेत्याची पहिलीच सभा सोलापूर शहरात होत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. बंदोबस्तासह त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे पाहात आहेत.

शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या (बुधवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोडनिंब (ता. माढा) येथून ते मोहोळमध्ये येणार आहेत. त्या ठिकाणी भाजप नेते संजय क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार तुळजापूरला जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com