शिक्षकांना 'अच्छे दिन'; विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना अनुदान

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

राज्यातील विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 20 टक्के अनुदान असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 20 टक्के अनुदान असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षकांकडून उपोषण केले जात आहे. मुंबईतील आझाद मैदानवर या शिक्षकांकडून उपोषण केले जात आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरीदेखील जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलक शिक्षकांनी घेतली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य शिक्षकांना फायदा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 Percentage Grant to unaided schools and colleges