आणखी 22 स्थानकांवर लवकरच वैद्यकीय कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुमारे 22 स्थानकांवर हे वैद्यकीय कक्ष सुरू करण्यासाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 

लोकल प्रवासादरम्यान जखमींना तत्काळ उपचार मिळावेत, त्यासाठी रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष गरजेचे आहे. मात्र मध्य रेल्वेच्या 10 स्थानकांवरच ही सुविधा आहे. त्यात हार्बर मार्गावरील तीनच स्थानके आहेत. वर्षभरात कुर्ला आणि घाटकोपर या गर्दीच्या स्थानकांवर जखमी प्रवाशांची संख्या अधिक असतानाही मध्य रेल्वेने कक्ष सुरू केलेला नाही. याबाबत समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. मध्य रेल्वेने प्रस्तावित आपत्कालीन वैद्यकीय कक्षांची माहिती द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार, रेल्वेने वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कुर्ला, घाटकोपर, वडाळा, दादर, मुलुंड, कर्जत, पनवेल, वाशी, भायखळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, विक्रोळी, कसारा, कळवा, मुंब्रा, अंबरनाथ, मानखुर्द, भांडुप, टिटवाळा, उल्हासनगर, गोवंडी व चेंबूर या स्थानकांची यादी रेल्वेने जाहीर केली आहे.

Web Title: 22 medical stations soon Room