coronavirus: राज्यातील  22 हजार ग्रामसेवक देणार एक दिवसाचा पगार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या लढाईला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई - कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या लढाईला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील ग्रामसेवकांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. 22 हजार ग्रामसेवकांचा एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचे निवेदन संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. हा निर्णय राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या संमतीने घेण्यात आला असल्याचे राज्य प्रसिद्ध प्रमुख बापु अहिरे यांनी सांगितले.

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 thousand gramsevak to give one day salary to the Chief Minister Relief Fund