‘महावितरण’ची २४ तास सेवा! लाईट गेल्यावर आता मोबाईलमध्ये बॅलन्स नसला तरी करता येणार ‘या’ क्रमांकावर कॉल; विजेसह बिलाचीही करता येणार तक्रार

वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना आता १९१२, १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या तिन्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवता येणार आहेत. बिलासंदर्भातील तक्रारीदेखील त्यावर नोंदविण्याची सोय असेल, असे ‘महावितरण’ने आवाहन केले आहे.
sakal
वीज बिल ई सकाळ
Updated on

सोलापूर : वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना आता १९१२, १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या तिन्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवता येणार आहेत. बिलासंदर्भातील तक्रारीदेखील त्यावर नोंदविण्याची सोय असेल, असे ‘महावितरण’ने आवाहन केले आहे. ही सेवा २४ तास कार्यरत असणार आहे.

सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तसेच त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक देयक तयार करण्यासाठी महावितरण कायम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते. यामध्ये अनेक रस्ते अपघात, नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते. मात्र, सद्य:स्थितीत ग्राहक ऑनलाइनपेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची जात आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांसाठी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ते टोल फ्री क्रमांक महावितरणच्या संकेतस्थळावर व वीजबिलांवरही देण्यात आले आहेत. तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा १२ अंकी ग्राहक क्रमांक नोंदवावा. त्यामुळे बिघाड शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. त्यांची तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. दरम्यान, वीज ग्राहकांनी फोनवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तक्रारी करणे टाळावे, जेणेकरून त्यांनाही काम करताना धोका होणार नाही.

‘एसएमएस’ अन्‌ मिस कॉलद्वारेही तक्रार

वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरून ०२२-५०८९७१००या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरून “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाइप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते. तसा संदेश ग्राहकाला जातो.

महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा वापर

महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाइन झालेल्या आहेत. ग्राहकांनी महावितरणचे ॲप प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. त्यामुळे एकापेक्षा जास्त वीज जोडण्या एकदाच नोंदणी करून हाताळता येतात. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहक घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com