ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे २५ आमदार नाराज, सोनिया गांधींची घेणार भेट

25 Congress MLA Disappoint in Thackeray Government
25 Congress MLA Disappoint in Thackeray Governmente sakal

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये खदखद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून २५ आमदार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. हे सर्व आमदार काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात नाराज असल्याचं कळतंय. (25 Congress MLA Disappoint in Thackeray Government)

25 Congress MLA Disappoint in Thackeray Government
काँग्रेस नेते म्हणाले, गडकरींनी मोदींशी चर्चा केल्यास हिताचे होईल

काँग्रेसच्या २५ आमदारांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री आपल्या मागण्यांना दाद देत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये आमच्या मागण्यांना महत्व नाही. याबाबत सोनिया गांधींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी एका पत्राद्वारे केल्याची माहिती आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी निधी देत नाहीत, तर पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी कशी करणार? असा सवाल एका आमदाराने उपस्थित केल्याचं वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलं आहे.

आमदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याला तीन आमदार नेमून दिले होते. नुकतीच महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी बैठक घेतली तेव्हा आम्हाला माहिती मिळाली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. पण आम्हाला अडीच वर्ष याची माहिती दिली नाही. कोणत्या मंत्र्यांकडे आमची जबाबदारी सोपविली? याबाबत आम्हाला अद्यापही माहिती नाही, असं एका आमदारानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची अडीच वर्ष वाया गेल्याची भावना या आमदारांची आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची नाराजी उघडपणे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार देखील निधी वाटपावरून नाराज आहेत. आमदार तानाजी सावंत यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. आता काँग्रेसच्या आमदारांची नाराजी समोर आली असून याबाबत काँग्रेस हायकमांड काय तोडगा काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com