25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणणार : नितीन गडकरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे, तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत 75 हजार कोटी रुपयांची विविध कामे विहित मुदतीत दर्जेदाररीत्या पूर्ण करण्यात येणार आहेत. वर्षभरात 25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. 

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या आणि प्रधानमंत्री सिंचन योजनेसंदर्भातील कामांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अकोला, बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या कामाप्रमाणे मराठवाड्यातदेखील नाले, नद्या रुंदीकरणाच्या, शेततळ्याच्या कामांतून उपलब्ध होणाऱ्या वाळू, मुरूम व तत्सम घटकांचा उपयोग रस्तेबांधणीच्या साहित्यात करावा. मराठवाड्यात 67 ठिकाणी ब्रिजकम बंधारे बांधण्यात आले आहेत. प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा योजनेअंतर्गत मराठवाड्यात 17 सिंचन प्रकल्प राबविण्यात येत असून, हे काम तत्परतेने होण्यासाठी केंद्रातून निधी थेट सिंचन विभागाला देण्याचे ठरवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 

नाशिक ते नांदेडपर्यंत जलमार्ग 

रस्ते, रेल्वे, हवाई मार्गापेक्षा जलमार्गाने होणारा प्रवास हा स्वस्त आहे. यामुळे आम्ही जलमार्गाच्या माध्यमातून "जेएनपीटी'ला जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. या माध्यमातून गोदावरीच्या जलमार्गाच्या माध्यमातून नाशिक ते नांदेड बोटीने प्रवास शक्‍य होईल. जलवाहतुकीच्या माध्यमातून मालवाहतूक करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा कापूस नांदेडमधून काकीनाडापर्यंत जाईल. याविषयी गोदावरीच्या जलमार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी नांदेडला मोठे पोर्ट तयार करणार असल्याचेही या बैठकीत गडकरी यांनी सांगितले. 

Web Title: 25 lakh hector land will Irrigation : Nitin Gadkari