आजपासून राज्यातून धावणार आहेत 26 विशेष ट्रेन; प्रवाशांची तिकीट बुकिंगही झाली.

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

सोमवार (ता. 1)पासून देशभरात 100 स्पेशल ट्रेन सोडून सुमारे 200 फेऱ्या करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले होते. सोमवारपासून महाराष्ट्रातून मध्य रेल्वेच्या 9 तर पश्चिम रेल्वेच्या 17 गाड्या धावणार आहे.

मुंबई : सोमवार (ता. 1)पासून देशभरात 100 स्पेशल ट्रेन सोडून सुमारे 200 फेऱ्या करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले होते. सोमवारपासून महाराष्ट्रातून मध्य रेल्वेच्या 9 तर पश्चिम रेल्वेच्या 17 गाड्या धावणार आहे. राज्यात अद्याप आंतरराज्य प्रवासी वाहतुकीला परवानगी नसल्याने रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू होती. अखेर संभ्रम दूर होऊन रात्री उशिरा राज्यातून या ट्रेन सोडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली.

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना, नागरिकांना, त्यांच्या राज्यात पोहचण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे 100 विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी राज्यातून पहिल्याच दिवशी सोमवारी दिवसभऱ्यात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून 26 ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रकही तयार करण्यात आले असून.  प्रवाशांनी तिकीट बुकिंग सुद्धा केली आहे.

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

पश्चिम रेल्वे मार्गावरून सोमवारी सुटणाऱ्या ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची आणि राज्य सरकारच्या चर्चेदरम्यान एकमत झाले आहे. सोमवारी ठरलेल्या वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्यात येणार आहे. 
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

रेल्वे प्रवासाकरिता असे असतील नियम
केंद्र शासनाने 1 जुन रोजी रेल्वे सेवा मर्यादित प्रमाणात सुरू करण्याबाबत कारवाई सुरू केली आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत संदर्भातील आदेशान्वये राज्य शासनाने नियम जाहीर केले आहे. या दरम्यान प्रवाशांना मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहणार आहे.

असा करता येणार रेल्वे स्थानकांपर्यंतचा प्रवास
1. प्रवासी नागरिक खासगी वाहनांचा वापर करू शकतील, त्यासाठी त्यांना ईतिकीट दाखवावे लागेल व पाच आसनी वाहन 3 प्रवासी, सात आसनी वाहनास 5 प्रवासी (वाहन चालकासह) प्रवास करू शकतील.
2. स्कुटर, दुचाकी, रिक्षाचा वापर करता येणार नाही.
3. प्रवाशांना टॅक्सीचा वापर करता येईल.

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर टॅक्सीसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई टॅक्सी मेन्स असोसिएशन यांच्या वतीने प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित प्रतिनिधींशी आगाऊ संपर्क करून टॅक्सी आरक्षित करावी, प्रवाशांनी शक्यतो व्हॉट्सअपवर मागणी नोंदवावी, म्हणजे संघटना प्रतिनिधी त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करतील, असे परिवहन उपायुक्त पुरुषोत्तम निकम यांनी आवाहन केले आहे.

रेल्वे स्टेशन नुसार प्रतिनिधी
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चंदू नायर : 9821640498
2. मुंबई सेंट्रल - चंदू नायर : 9821640498
3. लोकमान्य टिळक टर्मिनस - फरीद भाई : 7977774884, शशी दुबे : 9833080800, तुपे : 9082888380
4. वांद्रे टर्मिनस : देवडिया : 9029885938, कोटीयन :  7977927009
5. टॅक्सी संघटना प्रतिनिधी : श्याम खानविलकर : 8369545457, 8655551562


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 special trains were to run from the state from today; Passenger ticket booking was also done.