esakal | कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
sakal

बोलून बातमी शोधा

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.मुलूंड पश्‍चिमेला असलेल्या अगरवाल रुग्णालयाच्या विस्ताराचा आराखडा महानगर पालिकेने किमान 10 वर्षांपुर्वी तयार केला होता. मात्र, गेल्या वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरु झाले.

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा


मुंबई : मुंबईचा पुर्व उपनगराचा भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत आहे. महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयाचा विस्तारही किमान 10 वर्षांपासून कागदावरच असून या भागात 1 लाख नागरीकांसाठी पुर्व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.

मुलूंड पश्‍चिमेला असलेल्या अगरवाल रुग्णालयाच्या विस्ताराचा आराखडा महानगर पालिकेने किमान 10 वर्षांपुर्वी तयार केला होता. मात्र, गेल्या वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरु झाले. 120 खाटांच्या रुग्णालयाचा विस्तार करुन येथे 450 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. त्याच बांधकाम सुरु झाले होते. मात्र, आता ताळेबंदीमुळे हे कामही थांबले आहे. तर, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तारही असाच दहा वर्षांपासून रखडला आहे. सध्या 210 खाटांचे असलेले हे रुग्णालय 580 खाटांचे करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कामाचे भूमिपूजन झाले. 2009-10 मध्ये महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रुग्णालयांसाठी 2017 पासून महानगर पालिका निवीदा मागवत होती.

कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

"मुलूंडच्या अगरवाल रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी स्वत: 2013 पासून प्रयत्न करत आहे.सर्व स्तरावर बैठका आंदोलने झाली.आता जर हे रुग्णालय तयार असते तर कोविडच्या साथीत त्याचा चांगला वापर करता असता, असे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले. भांडूप येथेही सुपरस्पेशालीटी रुग्णालय महानगर पालिका उभारणार होती. मात्र,सध्या हे रुग्णालयाही कागदावरच आहे.

महापालिकेच्या 2019-20 या वर्षाच्या कार्यानुरूप अहवाला नुसार पुर्व उपनगरातील आठ रुग्णालयात 650 डॉक्‍टर उपलब्ध आहे. तर, 2011 च्या जनगणनेनुसार पुर्व उपनगराची लोकसंख्या 30 लाख 85 हजार 411 आहे. त्यानुसार प्रत्येक 1 लाख नागरीकांसाठी पालिका रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

उपनगरीय रुग्णालयात प्रामुख्याने डेंगी,मलेरीया तसेच इतर साथीचा आजारांचा भार असतो.तसेच लहान मोठ्या आजारासाठी रुग्ण उपनगरीय रुग्णालयातच जात असतात. मात्र,अपुऱ्या डॉक्‍टरांमुळे पुर्व उपनगरातील रुग्ण सेवेवर मर्यादा आली आहे. 

गेल्या 10 वर्षांत तिसऱ्यांदा असं घडल्याने मुंबईकर घामाघूम...

रुग्णसेवेचा बोजवारा
कुर्ला येथे आता पर्यंत अडीज हजारच्या आसपास कोविड रुग्ण आढळले आहेत.तर,चेंबूर,गोवंडी ,घाटकोपर या भागातील रुग्णसंख्या 1600 हून अधिक आहे.तर,भांडूप मध्ये आता पर्यंत 1461 रुग्ण आढळले आहेत.पण,या भागात रुग्णवाढीचा वेग 7.8 टक्के आहे. त्यामुळे येथे रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे.

loading image
go to top