एकाच वेळी 28 विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून राज्यातील 28 शहरांत 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी सकाळी वर्षा निवासस्थानी होणार आहे. एकाच वेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ होण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दिली. 

वाढते नागरीकरण ही समस्या न मानता संधी मानून केंद्र व राज्य सरकारच्या वतीने धोरणे आखण्यात येत आहेत. नागरी क्षेत्रातील पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व सांडपाण्याचा पुनर्वापर, हरितपट्टे या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगरोत्थान अभियानांतर्गत चिखलदरा पाणीपुरवठा योजना 3.81 कोटी, रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी, मानवत पाणीपुरवठा 8.62 कोटी, सेनगाव पाणीपुरवठा 12.87 कोटी, देवळाली प्रवरा पाणीपुरवठा 15.25 कोटी, दोंडाईचा वरवाडे पाणीपुरवठा 20.91 कोटी, सिंदखेडा पाणीपुरवठा 21 कोटी, मालेगाव उड्डाण पूल 21.72 कोटी, राहता भुयारी गटार योजना 24.81 कोटी, रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी, लोणावळा पाणीपुरवठा 33.49 कोटी, अहमदपूर पाणीपुरवठा 44.52 कोटी, पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी, जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी, चांदवड पाणीपुरवठा 64.05 कोटी, जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी, इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी, हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी, फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी, गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी अशा 20 शहरांतील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ एकाच वेळी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील शहरांमधील नागरिकांना अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे. 

अमृत योजनेंतर्गत 826 कोटींचे ई-भूमिपूजन 
अमृत अभियानांतर्गत अंबरनाथ पाणीपुरवठा योजना 13.63 कोटी, कुळगाव बदलापूर पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी, नाशिक मलनिःस्सारण योजना 28.79 कोटी, हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59, इचलकरंजी पाणीपुरवठा योजना 68.68 कोटी, अकोला पाणीपुरवठा योजना 110.82 कोटी, जळगाव पाणीपुरवठा योजना 249.16 कोटी, तर यवतमाळ पाणीपुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी अशा 8 शहरांमधील एकूण 826.72 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन होणार आहे. 

Web Title: 28 different projects of e-foundation stone