
प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर : सध्याच्या महागाईत घरांच्या किमती गगनला भिडल्या आहेत. मात्र कमी उत्पन्न असलेल्या समाज घटकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाने (महाहौसिंग) ‘प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घर’ योजनेंतर्गत सोलापूर शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. तीनपैकी कसबे सोलापूर व मजरेवाडी या दोन ठिकाणच्या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
सोलापूर शहरातील कसबे सोलापूर (रामवाडी), अंत्रोळीकरनगर व मजरेवाडी अशा तीन ठिकाणी मिळून ११ हजार १०७ घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कसबे सोलापूरमध्ये सर्वांत मोठा ६ हजार ९२५ घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जे पात्र नागरिक ९ हजार ९९९ रुपये भरून आधी नोंदणी करतील त्यांनाच प्राधान्याने घरे देण्यात येणार आहेत.
प्रकल्पाचे ठिकाण - कसबे सोलापूर (रामवाडी)
गट क्र. ४२०/अ/८/डोणगाव रोड येथील घरांची संख्या
१ बीएचके : (५६५३ सदनिका) - किंमत ११ लाख १६ हजार ६६६ रुपये - २९.६३ ते २९.९७ चौमी
२ बीएचके : (१३१२ सदनिका) - किंमत अंदाजे २४ ते २५ लाख रूपये - ४६.७६ ते ४७.०१ चौमी
---------------------------------------------------------------------------
मजरेवाडी, सोलापूर
गट क्र. ६९/१/अ, नई जिंदगी रोड, विमानतळशेजारी
१ बीएचके : (३८६७ सदनिका) - किंमत १० लाख १६ हजार ६६६ रुपये - २७.७५ ते २७.९७ चौमी
---------------------------------------------------------------------
अंत्रोळीकरनगर, सर्वे क्र ६३/१/अ
१ बीएचके सदनिका : (२७३ सदनिका) किंमत १३ लाख १० हजार ८८१ रुपये - २९.८३ चौमी
२ बीएचके सदनिका : (४२ सदनिका) किंमत २८ लाख २२ हजार ७१५ रुपये - ४९.९५ चौमी
व्यावसायिक दुकाने : ८१,३६०/- (प्रति चौरस मीटर)
‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज
आर्थिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत पात्र नागरिकांसाठी सुलभ गृहकर्ज योजनेची सोय केली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे २.५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. याशिवाय पात्र बांधकाम कामगारांसाठी अतिरिक्त २ लाखांचे अनुदान लाभार्थींना मिळणार आहे. https://mhdc.mahahousing.co.in/ या वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्याची सुविधा
सोलापुरात एकूण तीन प्रकल्प आहेत. त्यापैकी कसबे सोलापूर व मजरेवाडी येथील प्रकल्पांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अंत्रोळीकरनगर येथील प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही. गरिबांच्या स्वप्नातील घरे देण्यासाठी हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- टी. डी. कासार, प्रकल्प जाहिरातप्रमुख महाहौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.