भाजपला विचारा मतदानापूर्वी 30 प्रश्‍न 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - परदेशातला काळा पैसा भारतात आला का, शेतमालाला रास्त भाव मिळाला का, नोटाबंदीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून देणार का, असे भाजपला अडचणीत आणणारे तब्बल 30 प्रश्‍न राष्ट्रवादीने कॉंग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले आहेत. राज्यातील मतदारांनी भाजपला मतदान करण्यापूर्वी या 30 प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जनतेला करण्यात आले आहे. 

राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सोशल मीडियाच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांसह सर्व दिग्गज नेत्यांनी "फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांच्याच विधानानुसार आता "सरकार पाडण्यासाठी' उत्सुक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला थेट 30 प्रश्‍नांची उत्तरे मागितली आहेत. लोकसभा निवडणुकांआधी नरेंद्र मोदी आणि भाजपने दिलेल्या आश्‍वासनांविषयी पुढे काही ठोस कारवाई झाली नाही. परदेशातील काळा पैसा, राम मंदिर, लोकपाल नियुक्ती, काश्‍मीरप्रश्‍न, दहशतवाद, शेतमालाला रास्त भाव अशा अनेक समस्यांविषयी भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे याच मुद्द्यांविषयी भाजपला थेट प्रश्‍न विचारण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: 30 questions to ask before voting for the BJP