राज्यात आज 3386 नवे रुग्ण, तर 51 मृत्यू

राज्यात आज 51 मृत्यूंची नोंद झाली. दैनंदिन रुग्णांचा आकडा किंचित वाढला असून आज 3386 नवीन रुग्ण सापडले. तर 3933 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
Coronavirus
CoronavirusSakal

मुंबई - राज्यात आज 51 मृत्यूंची नोंद झाली. दैनंदिन रुग्णांचा आकडा किंचित वाढला असून आज 3386 नवीन रुग्ण सापडले. तर 3933 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,57,012 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.23 % एवढे झाले आहे.

राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,37,843 झाली आहे. राज्यात राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,38,776 इतका झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 38,491 इतकी आहे.

नागपूर,अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 11,नाशिक 7,पुणे 15,कोल्हापूर 15, लातूर 1,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,58,653 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com