
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वारकरी पंढरपुरात येतात. दर्शनवारीत होत असलेल्या घुसखोरीमुळे वारकऱ्यांच्या दर्शनाला बाधा येत होती, विलंब लागत होता. जेथून घुसखोरी होते, त्या ठिकाणी यावर्षी जाळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे, यासाठी आम्ही नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन या संदर्भात संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज दुपारी ‘सकाळ’च्या कार्यालयात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, कळसदर्शन, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शनाची आस घेऊन वारकरी पंढरपुरात येतात. कळसदर्शन, मुख दर्शनाला फार अडचणी येत नाहीत. परंतु पदस्पर्श दर्शनासाठी काटेकोर नियोजनाची गरज आहे. एका मिनिटात ३२ ते ३५ जण दर्शन घेऊ शकतील असे नियोजन आहे.
आषाढी यात्रे दरम्यान चेंगरा-चेंगरी, पाण्यात वाहून जाणे, शार्ट सर्किट, गॅसचा भडका अशी आपत्ती उद्भवली तर काय उपाययोजना असतील, या अनुषंगानेही आम्ही नियोजन केले आहे. चेंगरा-चेंगरी होऊ शकते असे १३ हॉटस्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी २२ जणांचे पथक नियुक्त केले जाणार आहे. होडी चालकांची माहिती, होडींचे फिटनेस सर्टिफिकेट, एका होडीत २० प्रवासी, १० स्थळ निश्चित केले आहेत. यासाठी टु-जीचे १५० वायरलेस फोन उपलब्ध केले आहेत. पंढरपुरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील हालचालींचा वेध घेण्यासाठी बस स्थानक परिसरात अधिकाऱ्यांसाठी तयार केले जाणार कंट्रोल युनिट, तेथे ५५ इंची एलईडीची सोय. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी त्याच ठिकाणी थांबतील.
पावसाची शक्यता गृहित धरून नियोजन
गेल्या वर्षी अंदाजे १८ ते २२ लाख वारकरी आले होते, यावर्षी २२ ते २४ लाख येतील असा अंदाज आहे. यावर्षी वारी दरम्यान जास्तीचा पाऊस या अनुषंगाने नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ३० हजार घनमीटरचे मुरुमीकरण होते, यंदा ७४ हजार घनमीटरचे आहे. गेल्या वर्षी ३ लाख १५ हजार चौरस फुटाचा मंडप होता, या वर्षी ७ लाख १२ हजार चौरस फुटांचा असणार आहे. यावर्षी ९ ठिकाणी जर्मन हँगर मंडप व ९४ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असणार आहेत. प्रत्येक साडेतीन किलोमीटरवर वॉटरप्रूफ मंडप असणार आहे.
आकडे बोलतात...
रुग्णवाहिका : २८
फिल्ड आयसीयू : ५ बेडची २१ ठिकाणी सुविधा
वारकऱ्यांसाठी जलस्रोत : ८३७
टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी फिडिंग पॉइंट : ११५
फिरते स्वच्छतागृह : ६ हजार २५०
कायमस्वरूपी स्वच्छतागृह : ४ हजार ५२०
मोबाईल चार्जिंग व्हॅन : ५ (एकावेळी एका ठिकाणी १०० मोबाईल चार्जिंगची सोय)
दूरध्वनी करण्यासाठी सेंटर : २०
दिंडीप्रमुखांना दिलेल्या मेडिकल किट्स : ४ हजार ५००
महिलांसाठी स्नानगृह : २ हजार १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.