रस्ते अपघातात दररोज ३७ मृत्यू 

रस्ते अपघातात दररोज ३७ मृत्यू 

सोलापूर -  राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघात होतात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रस्ते अपघातात दररोज सुमारे ३७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी दिली. 

अपघात अन्‌ ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हा स्तरावर खासदार, पालकमंत्री, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्‍त, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामार्ग या अधिकाऱ्यांची रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. वाढते अपघात अन्‌ मृत्यूची संख्या पाहता ही समिती नुसती कागदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. 

एकाच ठिकाणी सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्‍चित करून ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित केला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी ठोस उपाययोजना करून अपघात होऊ नयेत, असे नियोजन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यात २०१६ मध्ये ७४२ ब्लॅक स्पॉट होते, तर २०१७ मध्ये १,२७५ आणि २०१८ मध्ये १,३२४ ब्लॅक स्पॉट झाले. बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलिस असो की महामार्ग विकास प्राधिकरण, यांच्याकडून काहीच ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

अपघाताची प्रमुख कारणे... 
    महामार्गाची संपूर्ण माहिती नसताना वेगात वाहन चालवणे 
    रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने 
    रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे 
    कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे 
    हेल्मेट अथवा सीटबेल्ट न वापरता वाहन चालवणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com