Srikshetra Nageshwar: श्रीक्षेत्र नागेश्‍वर विकासासाठी साडेचार कोटींवर निधी मंजूर

Sri Kshetra Nageshwar drone captured panoramic view.
Sri Kshetra Nageshwar drone captured panoramic view.
Updated on

Srikshetra Nageshwar : सातपुड्याच्या डोंगररांगेतील जागृत मानले जाणारे व निसर्गसौंदर्याने नटलेल्या श्रीक्षेत्र नागेश्वर परिसराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत चार कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यातील एक कोटी ३३ लाख ५० हजारांच्या निधीचे वितरण झाले आहे. याकामी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी पाठपुरावा केला. (4 5 crores sanctioned for development of Srikshetra Nageshwar dhule news)

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधीची तरतूद केली जाते. त्यात श्रीक्षेत्र नागेश्वर परिसराचा अंतर्भाव करण्यासाठी पटेल बंधूंसह आमदार पावरा यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांना यश मिळून सुमारे साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

अशी होतील कामे

नागेश्वर मंदिर परिसरात काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपये, मंदिर परिसरात पार्किंग शेड बांधकाम करण्यासाठी ४० लाख रुपये, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५० लाख रुपये, सोयी-सुविधांसाठी ५० लाख रुपये, सभागृह बांधकाम करण्यासाठी एक कोटी रुपये, महिला व पुरुष प्रसाधनगृहाचे बांधकाम करण्यासाठी ४० लाख रुपये, संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये, बाके बसविण्यासाठी १५ लाख रुपये अशी निरनिराळी कामे या निधीतून साकारण्यात येणार आहेत.

बहुराज्यीय श्रद्धास्थान

श्रीक्षेत्र नागेश्वर संस्थान धार्मिक व पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे. खानदेशसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्रावणात येथे मोठी यात्रा भरते. वर्षभर येथे विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात.

Sri Kshetra Nageshwar drone captured panoramic view.
Sai baba Temple : साईबाबांच्या काळातील शिर्डी कशी होती? पहा शिर्डीचे जूने फोटो

श्रीक्षेत्र नागेश्वर संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून भूपेशभाई पटेल यांनी संस्थानच्या माध्यमातून येथे मोठी विकासकामे केली आहेत. मंदिर परिसराचा कायापालट केला आहे. वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात. वनराईने नटलेला हा परिसर पूर्णपणे विकसित करण्यासाठी भूपेशभाई यांनी मोठे योगदान दिले आहे. या परिसराच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

निसर्गसौंदर्यासह धार्मिक माहात्म्य

अजनाड बंगला (ता. शिरपूर) येथे श्री नागेश्वर महादेव मंदिर आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक काळापासून मंदिर आहे.

नाथ, शैव पंथीयांसह सर्व नागरिकांसाठी मंदिर खुले आहे. हे स्थान धार्मिक माहात्म्यामुळे भाविकांना, तर अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांनाही भुरळ घालणारे ठरले आहे. श्री नागेश्वराच्या पायथ्याशी औदुंबराच्या मुळाजवळ गोमुख आहे. त्यातून बारमाही जलप्रवाह वाहतो. उन्हाळ्यात गार, तर पावसाळा व हिवाळ्यात उष्ण पाणी निघते. परिसरात दुष्काळ पडला तरी हा प्रवाह आटत नाही. परिसरात निसर्गरम्य तलाव असून, त्याच्या काठावर विश्रांतिगृह आहे.

Sri Kshetra Nageshwar drone captured panoramic view.
Temples In India : या देवळात देव नाहीतर बुलेट अन् विमानाची केली जाते पूजा; इथल्या देवांची कथाच निराळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com