राज्यात ४८८ शाळा होणार आदर्श, नागपूर विभागातील ७३ शाळांचा समावेश

488 school will be ideal in state including 73 school of nagpur division wardha news
488 school will be ideal in state including 73 school of nagpur division wardha news

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488, तर नागपूर विभागातील 73 शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय निधीऐवजी सीएसआर व लोकसहभागाची मदत घ्यावी लागणार आहे. शासकीय, जिल्हास्तरीय, ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रीकरण करून या शाळा विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील एक हजार 500 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले होते. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेण्यासाठी 300 शाळांची यादी जाहीर केली होती. शाळांकडून यादीतील शाळा बदलणे व नवीन शाळा समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या 81  शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने, नागरी भागातील शाळा यांचा समावेश असणारी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

या शाळांसाठी वाढता लोकसहभागही मिळवावा लागणार आहे. शाळेच्या प्रांगणात अंगणवाडी असणे अपेक्षित आहे. भविष्यात पटसंख्याही वाढवावी लागेल. शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे. उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत किंवा देशाबाहेरील प्रशिक्षणासाठीही पाठवावे लागेल. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करून घ्यावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी नुकतेच जारी केले आहेत.

काय असणार आदर्श शाळेत -
आदर्श शाळांमध्ये आकर्षक इमारत, विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या, संगणक कक्ष, संरक्षक भिंत, विद्युतीकरण, व्हर्च्युअल क्‍लासरूम, ग्रंथालय, स्वतंत्र स्वच्छतागृहे, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह, भांडार कक्ष, पेयजल सुविधा व हॅण्डवॉश स्टेशन, खेळाचे साहित्य, आपत्ती व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 

नागपूर विभागातील शाळांची संख्या -

  • भंडारा 07
  • चंद्रपूर 16
  • गडचिरोली 16
  • गोंदिया 09
  • नागपूर 17

वर्धा 08

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com