esakal | राज्यात ४९ लाख मुलं लशीसाठी पात्र | Child
sakal

बोलून बातमी शोधा

CHILD VACCINATION
राज्यात ४९ लाख मुलं लशीसाठी पात्र

राज्यात ४९ लाख मुलं लशीसाठी पात्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील २ ते १८ वर्षे वयोगटातील ४९ लाख मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे आव्हान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यापुढे आहे. त्यासाठीची यंत्रणा आता सज्ज करण्यात येत असल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आली.

देशात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि पाठोपाठ १८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण खुले करण्यात आले. पण, १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणतीही लस उपलब्ध नव्हती. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांच्या चाचण्या सुरू होत्या. त्यापैकी भारत बायोटेक ही एक लस उत्पादक कंपनी होती. त्यांनी २ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सिन लस विकसित केली. कोरोनाच्या केंद्रीय तज्ज्ञ समितीने ही लस लहान मुलांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. या पार्श्वभूमिवर राज्यात किती लहान मुलांना लस द्यावी लागणार आहे, याची चाचपणी आरोग्य खात्याने सुरू केली. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा: "येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणार"

राज्याची एकूण लोकसंख्या १२ कोटी ४४ लाख आहे. त्यापैकी १८ वर्षे व त्यावरील वयाच्या नऊ कोटी १४ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य खात्याने निश्चित केले आहे. त्यापैकी ८ कोटी ८७ लाख दोन हजार ४०५ डोस देण्यात आले आहेत. त्यातील ६५ टक्के नागरिकांना पहिला डोस घेतला. तर, २८ टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. आता राज्यातील दोन ते १८ वर्षे वयोगटात २४ टक्के लोकसंख्या आहे. हे प्रमाण राज्यातील लोकसंख्येमध्ये ४९ लाखांपर्यंत आहे. आता त्यांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्र, इंजेक्शन सिरींज, लस वाहतूक व्यवस्था, लस साठवणूक केंद्र सज्ज करण्याच्या दृष्टीने आरोग्य खाते पावले उचलत आहेत.

loading image
go to top