महाराष्ट्राकडून केरळला ५० टन तूरडाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या वतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्‍स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून कुर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना करण्यात आली. पाटील म्हणाले की, केरळमधील पूर ओसरला असून, तेथील नागरिकांना डाळ, तांदूळ, तृणधान्य, सुकामेवा, बिस्किटे अशा विविध टिकणाऱ्या वस्तू 
पाठवित आहोत.

एक दिवसाचे वेतन
केरळला मदतीचा हात म्हणून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय नोकरशाहीने घेतला आहे. यातून दोनशे कोटी रुपये निधी गोळा होणार लोकप्रतिनिधींनी देखील सढळ हाताने मदत करण्याचे जाहीर केले आहे.

Web Title: 50 tone turdal help to keral by maharashtra