म्हाडा सोडत अर्जदारांची संख्या 60 हजारांवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सोडतीत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक नोंदणीची मुदत उद्या ( 23 जुलै) दुपारी 12 वाजता संपत आहे. शुक्रवारी (ता.22) सायंकाळपर्यंत अनामत रक्कम भरणाऱ्यांचा आकडा 60 हजारांवर गेला. तो एक लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

पूर्व व पश्‍चिम उपनगरांत विखुरलेल्या 972 घरांची सोडत प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. आतापर्यंत या घरांसाठी एक लाख 15 हजार 896 जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 60 हजार अर्जदारांनी प्रत्यक्ष अर्ज भरल्यानंतर अनामत रक्कम भरण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. बॅंकेत डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा करण्याची अंतिम मुदत 27 जुलै आहे. अखेरच्या टप्प्यात दिवसाला आठ ते दहा हजार अर्जदार अनामत रक्कम ऑनलाईन तसेच डीडीच्या माध्यमातून जमा करतात. त्यामुळे हा आकडा वाढला आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

महत्त्वाच्या अंतिम तारखा 

- आनॅलाईन अर्ज - 25 जुलै (दुपारी 12 वाजेपर्यंत) 

- ऑनलाईन अनामत रक्कम - 26 जुलै (दुपारी 12 वाजेपर्यंत) 

- बॅंकेत डीडी जमा करणे - 27 जुलै 

- प्रारूप यादी - 5 ऑगस्ट 

- अंतिम यादी - 8 ऑगस्ट 

- सोडत - 10 ऑगस्ट

Web Title: 60 thousand the number of applicants dropping mhada