'जलयुक्‍तसाठी पुढील वर्षात 6200 गावांचा समावेश'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून, उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड केलेल्या 6200 गावांमध्ये कामे तातडीने सुरू करावीत. राज्यात 76 हजार 106 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून 77 हजार विंधन विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात दिले. 

जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेत निवडलेल्या गावांपैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली आहति. गेल्या वर्षी निवडलेली 5031 गावे जून 2018 अखेरपर्यंत जलपरिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. 2018-19 साठी 6200 गावांची निवड झाली आहे. त्यामध्ये कोकण विभागातील 300, पुणे 900, नाशिक 1100, औरंगाबाद 1400, अमरावती 1300, नागपूर 1200 गावांची निवड केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीची कुठलीही कमतरता नसून ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी एक हजार कोटींचा निधी उद्या वितरित करण्यात येणार आहे. 30 जून 2018 पर्यंत टप्पा एकनुसार कार्यवाही करण्यात यावी. नोव्हेंबर ते मार्च 2019 पर्यंत टप्पा एकमधील कामे पूर्ण करून ही गावे जलपरिपूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण 
76 हजार 106 शेततळ्यांचे काम पूर्ण 
77 हजार विंधन विहिरींचे काम प्रगतिपथावर 
2900 धरणांमधून 1 कोटी 40 लाख 97 हजार 856 घनमीटर गाळ काढला. 

Web Title: 6200 villages in the next year for irrigation