

मुंबई - राज्यात एक जून ते आठ जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.