चिमुकलीवर 68 वर्षीय नराधमाचा लैंगिक अत्याचार 

अनिल दंदी
मंगळवार, 10 जुलै 2018

अकोला : आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज मंगळवारी ता. 10 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नया अंदुरा येथे घडली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय नराधमास उरळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  निरंजन गोंडुजी उमाळे (68) रा.नया अंदुरा असे आरोपीचे नाव आहे. नया अंदुरा परीसरात राहणाऱ्या 8 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी उरळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

आज मंगळवारी इयत्ता दुसर्‍या वर्गात शिकणारी चिमुकली घरात अभ्यास करत होती. व तीची आई शौचालयात गेली होती. यावेळी नराधम निरंजन याने घरात घुसून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. हा किळसवाणा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर नराधम तेथून निघून गेला. चिमुकलीचे वडील शेतात गेले होते. घरी परतल्यावर हा प्रकार त्यांना सांगीतला. त्यानंतर वडीलांनी उरळ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार सतिश पाटील यांना सर्व हकिकत बयान केली. क्षणाचा विलंब न लावता ठाणेदार पाटील यांनी घटनास्थळ गाठून आरोपी नराधम निरंजन उमाळे यास अटक केली. व चिमुकलीला स्त्री रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीवरून उरळ पोलीसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

आरोपीला फाशी देण्याची मागणी 
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात खळबळ उडाली असून सर्वच स्तरावर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून उद्या बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- सतीश पाटील
ठाणेदार, उरळ पोलीस ठाणे

Web Title: 68-year-old mad sexual harassment for eight years old girl