पोलिस भरतीत एका जागेसाठी ७० ते १०० उमेदवार; तरुण-तरुणींना अर्ज करण्यासाठी आता ३ दिवसच शिल्लक; राज्यात १५,६३१ पदांची भरती; मेपूर्वी पूर्ण होणार भरती

राज्यात १५ हजार ६३१ पोलिसांची भरती होणार असून, त्यासाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. या भरतीत सोलापूर ग्रामीणमधील ९० तर शहर पोलिस दलातील ७९ पोलिसांची भरती केली जाणार आहे. तरुण-तरुणींना भरतीत अर्ज करण्यासाठी तीन दिवसच शिल्लक राहिले आहेत.
solapur
police bharatisakal news
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पोलिसांची भरती होणार असून, त्यासाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. या भरतीत सोलापूर ग्रामीणमधील ९० तर शहर पोलिस दलातील ७९ पोलिसांची भरती केली जाणार आहे. तरुण-तरुणींना भरतीत अर्ज करण्यासाठी तीन दिवसच शिल्लक राहिले आहेत.

गृह विभागाच्या या भरतीत पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई अशी पदे भरली जाणार आहेत. या प्रत्येकी पदासाठी राज्यभरात उमेदवारास एकच अर्ज करता येणार आहे. एखादा उमेदवार पोलिस शिपाई, चालक शिपाई, कारागृह शिपाई अशा वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणार असेल तर त्याला विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याची मुभा आहे. २९ ऑक्टोबरपासून भरतीसाठी अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. ३० दिवसांत तब्बल १४ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याचे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आले.

अर्जासाठी आणखी तीन दिवसांची (३० नोव्हेंबरपर्यंत) मुदत आहे. त्यामुळे आणखी दीड लाखांपर्यंत अर्ज वाढू शकतात, असा अंदाज आहे. साधारणत: एका पदासाठी सरासरी १०० उमेदवार या भरतीत दिसतील, अशी अर्जांची स्थिती आहे. सोलापूर शहर व ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानांवर उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे.

‘या’ संकेतस्थळावर भरा अर्ज

पोलिस भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणींना policerecruitment 2025.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा लागेल. अर्ज करायला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मेपूर्वी पूर्ण होणार भरती प्रक्रिया

अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर त्याची छाननी होईल. जानेवारी- फेब्रुवारीत मैदानी चाचणीला सुरवात होईल. त्यात किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत, त्याशिवाय तो उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरत नाही. एका पदासाठी १० उमेदवारांची लेखीसाठी निवड होते. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मैदानी चाचणी पूर्ण व्हायला साधारणत: अडीच ते तीन महिने लागतील. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मे महिन्यात लेखी परीक्षा होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com