HSRP Number Plates
छत्रपती संभाजीनगर - राज्यात तब्बल दोन कोटी वाहनांना एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर ९० लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी बुकिंग केले. त्यातील ७३ लाख वाहनांना प्रत्यक्षात प्लेट बसवल्या आहेत. आता पुन्हा मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे.