दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RAILWAY NEWS
दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले

दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत

आज सकाळी औरंगाबाद मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले आहेत. दौलताबाद स्टेशजवळील वंजरवाडी पुलाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ लागू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशन्सवर अडकून पडल्या आहेत. (8 coaches derailed near Daulatabad railway station)

हेही वाचा: गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु

आज सकाळी औरंगाबाद मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेसेवा पूर्ववत होण्यासाठी दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान या घटनेमुळे या लोहमार्गावरील इतर गाड्या विविध रेल्वेस्टेशनवर अडकून पडल्या आहेत.

या रेल्वेगाड्या विविध स्टेशन्सवर अडकून पडल्या आहेत.

  • रोटेगाव काचीगुडा पैसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर

  • जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर

  • निजामाबाद पुणे पैसेंजर औरंगाबाद स्टेशनवर

  • अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर

अजूनही काळ ही रेल्वेवाहतूक ठप्प राहणार आहे.

Web Title: 8 Coaches Derailed Near Daulatabad Railway Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..