समृद्धी महामार्गासाठी 87 टक्के भूसंपादन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

औरंगाबाद : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या "समृद्धी महामार्गा'साठी लागणाऱ्या जमिनीपैकी 87 टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण जागेच्या 98 टक्के जमीनमालकांची संमती प्राप्त झाली असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अधिकारी राधेशाम मोपलवार यांनी "सकाळ'ला दिली. 

सातशे किलोमीटर लांब आणि राज्याच्या दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी 8600 हेक्‍टर जमीन लागणार आहे. यामध्ये महामार्ग उभारला जाणार आहे. या रस्त्यालगत उभारल्या जाणाऱ्या नवनगरांसाठी अद्याप जमिनीचे अधिग्रहण सुरू करण्यात आलेले नाही. समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी 87 टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरितांपैकी काही शेतकऱ्यांची संमती मिळणे अद्याप बाकी असल्याचे राधेशाम मोपलवार यांनी सांगितले. कडवट विरोध झालेल्या गावांमध्येही आता प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. 
 
Web Title: 87 percent land acquisition for the samruddhi Highway