
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. कारण चौकशीदरम्यान त्यामध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला आहे पण त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे महिलांना अखेर पैसे कधी मिळतील असा प्रश्न पडत आहे. परंतु आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे.