"एलएलबी-5'च्या प्रवेश परीक्षेला 90 टक्के उपस्थिती

"एलएलबी-5'च्या प्रवेश परीक्षेला 90 टक्के उपस्थिती

मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रविवारी (ता. 21) घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे 90 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. राज्यासह देशात 18 हजार 112 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्याबाहेरील विविध राज्यांमधील 13 परीक्षा केंद्रांवरही ही परीक्षा सुरळीत पार पडली. 

विधी अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांच्या प्रवेश परीक्षेसाठी 28 जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली होती. 11 मार्चपर्यंत चाललेल्या या नोंदणीमध्ये राज्यासह देशभरातून 22 हजार 276 विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती. त्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधून आठ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा महाराष्ट्रातील 36; तर राज्याबाहेरील 13 शहरांमध्ये झाली. या परीक्षेला राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. गुजरात 131, कर्नाटक 224, भोपाळ 1220, पश्‍चिम बंगाल 302, उत्तर प्रदेश 720, गोवा 17, जम्मू व काश्‍मीरमधील 27 विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा दिली. 

मुंबईमधून दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावर उमेदवारांची संख्या परीक्षा केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने काही उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्राच्या विकल्पाऐवजी जवळचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे तक्रारी केल्या. 

सीईटी सेलने या संदर्भात सांगितले की, परीक्षा केंद्रात परीक्षा वेळेच्या अगोदर 15 मिनिटे पोहोचलेले विद्यार्थी लॉगीन करू शकले. मात्र उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत न आल्याने परीक्षा केंद्रात घेऊनही ते लॉगीन करू न शकल्यामुळे परीक्षा देता आली नसती. त्यामुळे परीक्षा केंद्रात केंद्रप्रमुखांनी मज्जाव केला. 

विद्यार्थी नोंदणी : 20 हजार 276 
परीक्षा दिलेले विद्यार्थी : 18 हजार 112 
उपस्थितीची टक्केवारी : 89.33 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com