राज्यात आज 9170 कोरोना बाधित, तर 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 158 वर पोहचलीय.
राज्यात आज 9170 कोरोना बाधित, तर 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

मुंबई - राज्यात दिवसागणिक कोरोना (Corona Cases In Maharashtra) बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शनिवारीदेखील राज्यात 9170 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. एकट्या मुंबईमध्ये आज 6 (Mumbai Corona Cases) हजार 347 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 158 वर पोहचली असून राज्यात आज 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आल्याने ही संख्या आता 460 वर पोहोचली आहे. राज्यात आज 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 170 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 65 लाख 10 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (New Corona Cases In Maharashtra). आज 1445 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 65,10,541 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.35 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 2,26,001 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1064 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन (Omicron Cases In Maharashtra) बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत 460 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आतापर्यंत 1437 ओमिक्रॉन (Omicron Count In India) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने देशासह राज्याची चिंता वाढली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी (Corona Third Wave) लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कडक करण्यात आली आहेत. (Covid Appropriate Behavior )

राज्यात आज 9170 कोरोना बाधित, तर 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद
विद्यार्थ्यांना लसीसाठी ६५० विशेष केंद्रं; जागेवरच नोंदणीद्वारे मिळणार लस

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात कोरोनाव्हायरसच्या (Corona Cases In India) वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना तात्पुरती रुग्णालये स्थापन करण्यास, होम आयसोलेशनवर देखरेख वाढवण्यास आणि विशेष पथके स्थापन करण्यास सांगितले आहे. (Union Health Secretary Rajesh Bhushan issued new guidelines to all states and UTs)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com