राज्यात कोरोना, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा वाढणार; राजेश टोपे

लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र कडक निर्बंध
rajesh tope
rajesh topeEsakal

देशामध्ये ओमिक्रॉनची (Omicron) रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा बारा ते पंधरा हजारावर जाण्याची शक्यता आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. डेल्टा आणि ओमिक्रॉनची (Delta, Omicron) रुग्ण यांच्यातील प्रमाण जर समजले तर यावर उपाय करण्यास मदत होईल. असेही ते म्हणाले.

मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona)विषाणूने डोकं वार काढलं आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातारण आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. पुन्हा राज्यात लॉकडाऊन (Lockdowen)लागणार का? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. यावर राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र कडक निर्बंध लावण्यात येणार राजेश टापे यांनी सांगितलं. याचबरोबर ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

rajesh tope
Omicron Updates : देशात ओमिक्रॉनची रूग्णसंख्या 1431 वर

राजेश टोपे काय म्हणाले?

लॉकडाऊनचा सध्या विचार नाही, पण निर्बंध वाढणार आहेत. राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत काम सुरु झालं आहे. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1431 च्या घरात

भारतातील ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची आकडेवारीत सातत्याने वाढ असून यामध्ये महाराष्ट्र – 454, दिल्ली – 351, गुजरात – 115, तेलंगणा – 62, केरळ – 109, तामिळनाडू – 118, कर्नाटका – 34, राजस्थान – 69, ओडिसा – 14, आंध्र प्रदेश – 17, जम्मू-काश्मीर – 03, पश्चिम बंगाल – 17, उत्तर प्रदेश – 08, चंदीगड – 03, लदाख – 01, उत्तराखंड – 04, गोवा - 01, मध्य प्रदेश - 09, हिमाचल प्रदेश - 01, मणिपूर - 01, अंदमान-निकोबार - 02, हरियाणा - 37, पंजाब एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. (India Omicron State wise cases number )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com