यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे यंदाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी 2020 मध्ये होणार.

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे यंदाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी 2020 मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली आहे.

संमेलनाच्या नेमक्या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. गेल्या सात आठ वर्षांपासून मसापची उस्मानाबाद शाखा हे संमेलन मिळावे म्हणून प्रयत्नशील होती. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नाशिक व उस्मानाबाद येथील दोन संस्थांनी निमंत्रणे पाहणीसाठी निवडली. व त्या ठिकाणी पाहणी केली. या समितीने तिचा अहवाल महामंडळाला दिला होता.

यावेळी कार्यवाह दादा गोरे, उस्मानाबादचे संयोजक व मसापचे अध्यक्ष नितीन तावडे आदी सभासद उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 93rd Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan will be in Osmanabad