Summer Holiday : चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा; उन्हाळी सुट्यांसाठी तब्बल 942 स्पेशल गाड्या

उन्हाळी सुटीसाठी (Summer Holiday) मध्य रेल्वे प्रशासनानं (Central Railway) एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्या जाहीर करत चाकरमान्यांना दिलासाच दिला आहे.
Summer Holidays Central Railway
Summer Holidays Central Railwayesakal
Summary

शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर उन्हाळी सुटीसाठी कुटुंबीयांसह चाकरमानी गावची वाट धरतात.

खेड : उन्हाळी सुटीसाठी (Summer Holiday) मध्य रेल्वे प्रशासनानं (Central Railway) एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्या जाहीर करत चाकरमान्यांना दिलासाच दिला आहे. या गाड्या विक्रमी गर्दीनेच धावत असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाही सुरूच आहे; मात्र नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने उन्हाळी सुटीसाठी गावी जायचे तरी कसे? अशी चिंता चाकरमान्यांना सतावत आहे.

'वेटिंग वर असलेले चाकरमानी खासगी वाहनांचा आधार घेत गाव गाठत आहेत. उन्हाळी सुटीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरार या भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी वास्तव्यास आहेत.

शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर उन्हाळी सुटीसाठी कुटुंबीयांसह चाकरमानी गावची वाट धरतात. चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी रेल्वेचाच प्रवास किफायतशीर व सुरक्षित वाटत असल्याने चाकरमान्यांची पसंती रेल्वेगाड्यांनाच असते. याचमुळे कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी चाकरमानी सकाळपासूनच तिकीट खिडक्यांवर रांगा लावतात.

Summer Holidays Central Railway
Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

मात्र, तिकीट खिडकी उघडताच अवघ्या ५ ते १० मिनिटातच आरक्षण हाऊसफुल्ल होऊन तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. सद्यःस्थितीत उन्हाळी सुटीत गावी येणारे चाकरमानी प्रतीक्षा यादीवरच आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे १३ मे पर्यंतचे वेटिंग तिकीटही संपले आहे.

Summer Holidays Central Railway
Police Exam Case : भरती परीक्षेत कॉपी करणारे परीक्षार्थी पोलिसांच्या जाळ्यात; ब्ल्यू टूथचा केला होता वापर

तर १४ मे पासूनचे प्रवाशी वेटिंगवरच आहेत. जनशताब्दी एक्स्प्रेसचेही १२ मे पर्यंतचे वेटिंग तिकीट संपले आहे तर १६ मे पासूनचे प्रवाशी वेटिंगवरच आहेत. तुतारी एक्स्प्रेसचेही प्रवासी प्रतीक्षा यादीवरच आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल ९४२ उन्हाळी स्पेशलच्या फेन्या चालवण्याची घोषणा केली आहे. या उन्हाळी स्पेशलही विक्रमी गर्दीनेच धावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com