

Kharif Crop Sowing : देशात यंदाच्या खरिपामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भाताचे क्षेत्र १६ लाख २३ हजार हेक्टरने वाढून तीन कोटी ८४ लाख पाच हजार हेक्टरपर्यंत पोचले. मात्र तरीही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत देशात ९६.५० टक्के पेरण्या झाल्या आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाख ६३ हजार हेक्टरने अधिक म्हणजे, दहा कोटी ५३ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरण्या उरकल्या आहेत. (96 percent sowing of Kharif in country news)
बिहार, छत्तीसगड, तेलंगण, झारखंडमध्ये अधिकचे, तर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाताचे क्षेत्र कमी राहिले आहे. पावसाच्या अनिश्चित हजेरीमुळे ज्वारीच्या क्षेत्रात एक लाख १५ हजार हेक्टरने घट होऊन १३ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. शिवाय डाळींचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा दहा लाख ६३ हजार हेक्टरने कमी राहिले असून, डाळींची पेरणी एक कोटी १७ लाख ४४ हजार हेक्टरवर झाली.
डाळींमध्ये राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये अधिकचे, तर मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये कमी क्षेत्र राहिले. तेलबियांची गेल्या वर्षीपेक्षा एक लाख ८० हजार हेक्टरने कमी म्हणजे, आतापर्यंत एक कोटी ८८ लाख ५८ हजार हेक्टरवर लागवड झाली. भुईमुगाचे एक लाख ४८ हजार, सूर्यफुलाचे एक लाख २३ हजार हेक्टरने गेल्या वर्षीपेक्षा क्षेत्र कमी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भुईमुगाची ४३ लाख २७ हजार, सूर्यफुलाची ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली. कापसाची लागवड दोन लाख २७ हजार हेक्टरने कमी म्हणजेच, एक कोटी २२ लाख ५६ हजार हेक्टरवर झाली आहे. मात्र उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा ४७ हजार हेक्टरने वाढले आहे. देशात उसाची ५६ लाख सहा हजार हेक्टरवर लागवड झाली.
भरड-तृणधान्याचे क्षेत्र वाढले
देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत भरड-तृणधान्याचे क्षेत्र दोन लाख दोन हजार हेक्टरने वाढले आहे. भरड-तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र एक कोटी ८१ लाख ९१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी एक कोटी ७८ लाख ३३ हजार हेक्टरवर आतापर्यंत लागवड झाली आहे. गेल्या वर्षी एक कोटी ७६ लाख ३१ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.