Shivsena: ठाकरे गटाला मोठा दणका, 1000 कार्यकर्त्यांसह मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार

शिंदे गट फुटल्यापासून ठाकरे गटाला गळती सुरू झाली
Shivsena: ठाकरे गटाला मोठा दणका, 1000 कार्यकर्त्यांसह मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार
Updated on

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि 40 आमदार आता ठाकरे गटाचे आणि इतर पक्षाचे डोकेदुखी ठरले आहेत. दरम्यान शिंदे गट फुटल्यापासून ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. याउलट बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर या गटात इन्कमिंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान सय्यद यांच्यासह 1000 हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

दरम्यान ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद कार्यकर्तेसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

Shivsena: ठाकरे गटाला मोठा दणका, 1000 कार्यकर्त्यांसह मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार
Sushma Andhare: शिंदे गटाची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

उद्या (सोमवारी) आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहे. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.

दरम्यान सुषमा अंधारे यांचे पती वैजिनाथ वाघमारे हे ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर आज दुपारी 1 वाजता अभिनेत्री दीपाली सय्यदही पक्षप्रवेश करणार आहेत.

Shivsena: ठाकरे गटाला मोठा दणका, 1000 कार्यकर्त्यांसह मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार
Shivsena: कीर्तिकरांना म्हातारपणात म्हातारचळ लागलंय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जहरी टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com