Shivsena: कीर्तिकरांना म्हातारपणात म्हातारचळ लागलंय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जहरी टीका

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला
 Shinde Group
Shinde GroupEsakal

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटामध्ये मोठी खळबळ उडाली. पक्ष सोडल्यानंतर कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षावर टीका केली होती. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर ठाकरे गटाकडून कीर्तिकर यांच्यावर टीका करण्यात येत आहेत.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही कीर्तिकर यांच्यावर सडकून टीका केलीय. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागली आहेत. पक्षात काही अडचणी असतील तर त्या बोलायच्या होत्या असं गद्दार लोकांमध्ये सामील होणं चुकीच आहे अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केलीय.

 Shinde Group
Jitendra Awhad: पोलिसांना सारखा फोन करणारा 'तो' चाणक्य कोण? चर्चांना उधाण

चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले की, गजाभाऊंनी पक्ष सोडला याचं मला खूप दु:ख झालं आहे. गजाभाऊ आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात औरंगाबाद आणि जालन्यात खूप काम केलं. आम्हाला त्यांनी घडवलं. त्यांना पक्षात काही गोष्टी खटकत होत्या तर त्यांनी सांगायला हवं होतं. अशा गोष्टींसाठी पक्ष सोडल्याने मला खूप दु:ख झालं. गजाभाऊंनी बाळासाहेबांसोबत काम केलं होतं. दोनदा खासदार झाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं होतं. मंत्रीपदही दिलं होतं. अजून काय हवं होतं. इतकं पक्षांनी दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही. असं चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले आहेत.

 Shinde Group
Shivsena: पक्षासोबत किर्तीकरांच्या घरातही फूट; बापाच्या मतदारसंघाला लेक लावणार सुरुंग?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com