

ATS Raids in solapur
esakal
सोलापूर : बार्शी शहरातील अल हलिमी फाउंडेशनने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी न करताच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून चार वर्षांत सव्वादहा कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. संस्थेला दरवर्षी सरासरी दहा हजार देणगीदारांकडून देणग्या मिळाल्या. या देणगीदारांवर एटीएसची नजर आहे. या संस्थेविरुद्ध सोलापूर एटीएसने तब्बल १४ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
पाकिस्तानातील दावत-ए-इस्लामी या संस्थेच्या अंतर्गत बार्शीचे अल हलिमी फाउंडेशन कार्यरत होते. संस्थेचे अध्यक्ष अन्सार रफिक पठाण (रा. बार्शी), उपाध्यक्ष आरिफ रशीद बागवान (रा. मोहोळ) आणि सचिव असलम लतिफ शेख (रा. बार्शी) हे कारभार पाहत होते. यापैकी उपाध्यक्ष आरिफ बागवान आणि फाउंडेशनच्या लेखापालाला अटक करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सचिव फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.