Ajit Pawar
sakal
राजकारणातील एक झंझावात निमाला...कुशल प्रशासक, कार्यतत्पर नेता, जातनिरपेक्ष असा नेता. महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत झटणारा, दिलेला शब्द पाळणारा, दिलखुलास, सडेतोड, प्रशासनावर भक्कम पकड असलेला द्रष्टा नेता हरपला... महाराष्ट्राची नस गवसलेला एक अत्यंत मोठा लोकनेता गमावल्याची भावना व्यक्त करून राज्यातील विविध नेत्यांनी, मान्यवरांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.