तरुणाची आत्महत्या; २० वर्षाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत होते प्रेमसंबंध

एका 25 वर्षीय तरुणाला 20 वर्षाने वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडणे, चांगलेच महागात पडले आहे
commits suicide by hanging himself
commits suicide by hanging himselfsakal

नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाला 20 वर्षाने वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडणे, चांगलेच महागात पडले आहे. या तरूणाने या महिलेच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा आरोप तरूणाच्या कुंटुबाने केलाय. याहुन धक्कादायक म्हणजे प्रियकराच्या आत्महत्येने घाबरलेल्यामुळे महिलेने त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघात झाल्याचा भासविले. रमेश रवींद्र मोरे (25) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

रमेशची या महिलेशी बसमध्ये पहील्यांदा भेट झाली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केले. यानंतर दोघांची जवळीक वाढत गेली. यानंतर काही दिवसांनी रमेश महिलेच्या घरी राहू लागला. रमेश महिलेला सोडुन जाणार, या भीतीने ती त्याला लग्न करण्याचा आग्रह धरत होती. लग्नाचा दबाव टाकुन ती रमेशचा छळ करत असे. त्यामुळे त्याने महिलेच्या छळाला कंटाळुन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहेत.

commits suicide by hanging himself
ऐकावं ते नवलच! १० वर्षांच्या मुलाच्या तोंडात होते ५० दात! डॉक्टरही हैराण

रमेश पोस्टमार्टम अहवालात त्याचा फाशीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. रमेशने महिलेच्या घरीच गळफास घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. जेव्हा महिलेला रमेशने आत्महत्या केल्याचे समजले तेव्हा महिलेने तिचा मुलगा आणि मित्रासह रमेशचा मृतदेह रस्त्यावर फेकून देत रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com