‘आधार’ पुन्हा कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीनंतर शहरासह जिल्ह्यात एकूण ३९६ आधार केंद्रे पुन्हा कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे नवीन आधार कार्ड नोंदणीसह वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, छायाचित्रांमध्ये दुरुस्ती अादी कामे करता येतील. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पुणे - विधानसभा निवडणुकीनंतर शहरासह जिल्ह्यात एकूण ३९६ आधार केंद्रे पुन्हा कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे नवीन आधार कार्ड नोंदणीसह वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, छायाचित्रांमध्ये दुरुस्ती अादी कामे करता येतील. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सरकारी कार्यालयांमधील कामे, रुग्णालयातील उपचार, रेल्वे, विमानप्रवासासह विविध कारणांसाठी आधार क्रमांक बंधनकारक आहे. आधारनोंदणीसोबतच आधार कार्डवरील वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, छायाचित्रांमधील दुरुस्त्यांसाठी नागरिकांची आधार केंद्रांवर गर्दी होते. परंतु, निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत आधार केंद्रांतील कामे जवळपास ठप्प झाली होती. पुणे शहरात २०६, पिंपरी-चिंचवड शहरात ७४ आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११६ आधार केंद्रे आहेत. ‘आपले सेवा केंद्र’, सरकारी कार्यालये, बॅंका, टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar Card Registration