Aaditya Thackeray l नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Kolhapur : नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

कोल्हापूर: प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन आणि पर्यावरणाचा आढावा आम्ही सतत घेत असतो. सांगली (Sangli), कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणाचे चांगले काम सुरु आहे. कोल्हापूरी (Kolhapur) पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येतो का यावर जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar), सी.ई.ओ, कमिशनर यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे. माझी वसुंधरा अंर्तगत महाराष्ट्रभर आम्ही जे काम करत आहोत यामध्ये जनसहभाग, लोकप्रतिनिधींचा सहभाग कसा वाढवता येईल याचा अभ्यास सुरु आहे. तसेच गटार आणि रसायनयुक्त पाणी नदीत मिसळू नये यावर अभ्यास सुरु असल्याची माहिती पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

नदी, तलाव स्वच्छ करण्यासाठी तीन वेगवेगळ्या पातळीवर काम सुरु आहे. यामध्ये फ्लोटींग डेबरी यावर काम सुरु आहे. त्याचसोबत नागरीक आणि संस्था यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नद्यांमध्ये गटारींचे पाणी मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे. पंचगंगेचा प्रस्ताव आला आहे. यासाठी फंड देण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा: Sanjay Raut l मी गावचा पाटील, कोल्हापूरी भाषेत बोलू का? चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील महापूरा (kolhapur Flood ) संदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, हा विषय खूप गंभीर आहे. कारण पावसाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे नद्यातील गाळ काढणे,रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे यावर काम सुरु आहे. त्याचबरोबर आर.सी.सी भिंती न होता फक्त गावच त्या ठिकाणी राहिल असे प्रयत्न सुरु आहेत. नद्यांमधील गाळाचा वापर चांगल्या पध्दतीने कसा करता येईल याचा विचार जागतिक पातळीवर सुरु आहे. यामुळे शेतीला देखील याचा फायदा होईल असेही ठाकरे म्हणाले.

Web Title: Aaditya Thackeray River Pollution Suggestion Kolhapur Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..