आदित्य ठाकरेंची आजपासून शिवसंवाद यात्रा, ठाण्यात शक्तीप्रदर्शन

Aaditya Thackeray shiv sanvad
Aaditya Thackeray shiv sanvadesakal

आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही आता जायला लागले आहेत, त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत. या शिवसंवाद यात्रेदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच जाणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेकडे लागले आहे.(Aaditya Thackeray shiv sanvad yatra eknath shinde maharashtra politics)

आजपासून आदित्य ठाकरे 3 दिवसाच्या शिव संवाद यात्रेसाठी निघणार आहे. या यात्रेची सुरुवात भिवंडीतल्या मेळाव्याने होणार आहे. या यात्रेसाठी निघताना धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ठाणे इथून शिवसैनिकांच स्वागत स्वीकारून आदित्य ठाकरे पुढे जाणार आहेत.

Aaditya Thackeray shiv sanvad
शरद पवारांचा मोठा निर्णय;राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी,औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला भिवंडीमधून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ते त्यांचं ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येईल. आदित्य ठाकरे सत्तानाट्यानंतर ठाण्यात प्रथम शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यानंतर भिवंडीतदुपारी १२ वाजता शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्यापासून शिवसंवाद यात्रेला सुरुवात होईल.

Aaditya Thackeray shiv sanvad
शिंदे सरकार लवकरच करणार 100 दिवसांच्या संकल्पपत्राची घोषणा

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मनमाड मधील मेळाव्यापासून होईल. तिसऱ्या दिवशी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. पैठण, गंगापूर, नेवासा येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डी मध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com