शिंदे सरकार लवकरच करणार 100 दिवसांच्या संकल्पपत्राची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Fadanvis

शिंदे सरकार लवकरच करणार 100 दिवसांच्या संकल्पपत्राची घोषणा

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले शिंदे फडणवीस सरकार लवकरच 100 दिवसांच्या कार्यक्रमांसंबंधीचे संकल्पपत्र सादर करणार आहेत. राज्यातील विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने अशा प्रकारचे संकल्पनापत्र निश्चित करण्याचे निश्चित करण्यात आले असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवले असून त्यात सूचना पाठवण्यास सांगण्यात आले आहे. पत्रामध्ये 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागाच्या कुठल्या कामांचा, योजनांचा समावेश करायचा याबाबत सूचना पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी

जाहीर करण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या संकल्पपत्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात असलेल्या लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, विविध विभागांकडून येणाऱ्या कामांच्या प्रस्तावानंतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीकडून याची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कार्यक्रमाला अंतिम रुप देण्यात येणार आहे.

हेही वाचा: गुटखा बंदीला दहा वर्षे पूर्ण! बंदीनंतरही विक्री 'ओक्के' मध्येच

जाहीर करण्यात येणाऱ्या या कार्यक्रम पत्रिकेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री फेलोशिपचा उपक्रम पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, मविआ सरकार आल्यानंतर हा उपक्रम बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता हा उपक्रम नवीन स्वरूपात पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Maharastra Government Soon Declared 100 Days Program Of State Development

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top