
राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे शासकीय कामकाजात सक्रिय झाले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आदित्य यांनी मंत्रालयासमोरील शिवालय या पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला आहे.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे शासकीय कामकाजात सक्रिय झाले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आदित्य यांनी मंत्रालयासमोरील शिवालय या पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असून, सध्या ४२ मंत्री कार्यरत झाले आहेत. मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाले नसले, तरी मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कालपासूनच मंत्रालयात गर्दी वाढली आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयात सातव्या मजल्यावर दालन मिळाले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि आदित्य ठाकरे यांनादेखील कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने राज्यभरातील शिवसैनिकांची मंत्रालयात गर्दी वाढली आहे.
धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी
राज्यातून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी प्रवेश पास घेणे बंधनकारक आहे. मात्र, मंत्रालयात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंतच पास देण्याची सुविधा असल्याने उशिरा येणाऱ्यांना प्रवेश मिळत नाही. तसेच मंत्रालयातील गर्दीमुळे आदित्य ठाकरे यांची भेट मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनतेला भेटण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दुसरा पर्याय स्वीकारला आहे.
मंत्रालयाच्या समोर मंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यापैकी एक बंगला पक्ष कार्यालयासाठी शिवसनेने मिळवला आहे. याला ‘शिवालय’ असे नाव देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी या कार्यालयाचा ताबा घेतला असून, ज्यांना मंत्रालयात भेट घेता येत नाही, त्यांनी ‘शिवालया’त येण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.