
Aaditya Thackeray : 'AU कोण?', रिया चक्रवर्तीने फार पूर्वीच सांगितलं होतं; पाहा व्हिडीओ
राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या एकाच मुद्द्यावरुन गाजतोय. आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तींना ४४ फोन केला, असे आरोप होतायत. त्या संदर्भात रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र तसंच भाजपा आमदार नितेश राणेंनी हे प्रकरण लावून धरत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा हा मुद्दा उकरुन काढला.
AU या नावाने रिया चक्रवर्तीला ४४ फोन आले. हे AU म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असाही आरोप करण्यात आला. या आरोपानंतर आता रिया चक्रवर्तीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत AU कोण, याबद्दल रिया चक्रवर्तीने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
हेही वाचा: Disha Salian : आदित्य ठाकरे अडचणीत? 'त्या' प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान
रिया चक्रवर्ती त्या मुलाखतीत सांगते, "माझी मैत्रिण आहे अनाया उदास, तिचं नाव सेव्ह आहे AU म्हणून. तर ह्यांनी त्याचं बनवलं आदित्य उद्धव. मी, माझ्या मैत्रिणीने, आदित्य ठाकरेंनी आम्ही सगळ्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मी आदित्य ठाकरेंशी कधी बोलले नाही, त्यांना ओळखत नाही, त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही".