‘जनताच माझे विठ्ठल-रखुमाई’ - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिंपरी - ‘आषाढी एकादशीला आपण पांडुरंगाचे स्मरण करतो. महाराष्ट्रातील १२ कोटी जनता मला विठ्ठल-रखुमाई समान आहेत. त्यांचे दर्शन घेण्याचा योग आज आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो, अशी अपेक्षा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. 

पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या वतीने चिंचवडगाव येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘क्रांतिवीर चापेकरबंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.'

मराठा आंदोलकांना अटक
मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघ आणि क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवड येथे घोषणाबाजी करीत आंदोलन केले. पोलिसांनी २० आंदोलनकर्त्यांना अटक केली. तसेच फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच, एका महिलेने मराठा आरक्षणाबाबत घोषणा द्यायला सुरवात केली, तिलाही पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. 

Web Title: aashadhi ekadashi vittal rukmini devendra fadnavis